उन्हाचं कारण देत लॉन्ग मार्चला पोलिसांची नोटीस, मात्र आंदोलनाला सुरुवात किसान सभा
Akole Long March : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून आज दुपारी तीन वाजता किसान सभेचा लॉंग मार्च (Long March) सुरुवात झाली आहे. या मार्चला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. अजित नवले यांना पोलिसांनी तशी नोटीसही बजावलेली आहे. अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम आहे.
अहमदनगर: जिल्ह्यातील अकोले येथून आज दुपारी तीन वाजता किसान सभेचा लॉंग मार्च (Long March) सुरुवात झाली आहे. या मार्चला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. अजित नवले यांना पोलिसांनी तशी नोटीसही बजावलेली आहे. अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम आहे.
शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागणीसाठी आज पुन्हा शेतकरी किसान सभेचा लॉन्ग मार्च निघत आहे. आज दुपारी तीन वाजता अकोले ते लोणी या लॉग मार्चला सुरुवात होणार आहे. मात्र या लॉंग मार्चसाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत वाढलेल्या उन्हामुळे हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खारघरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विनंती केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान मोर्चा निघायला अजून वेळ असून आमची चर्चा सुरु राहिल. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास मोर्चा स्थगित करण्याची आंदोलकांची तयारी असल्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान किसान सभेचे अजित नवले म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या या पोरांचं हृदय शेतकरी बापासाठी तीळतीळ तुटलेला आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे पोलीस हे आमचे दुश्मन नाहीत, ते त्यांचं काम करत आहेत. त्यांनी ते करावं. सरकारला मात्र आम्ही उन्हात चालण्याची खूपच चिंता वाटायला लागलेली आहे. मात्र शेतकरी मायमाऊल्या आणि शेतकरी आयुष्यभर उन्हात काम करतात. उन्हात तळपून तयार केलेल्या कांद्याला आज 300 ते 400 रुपये भाव मिळत आहे. त्या उन्हात कष्ट केलेला काम केलेल्या माऊलीच्या घामाला दाम नाही, याची मात्र सरकारला चिंता वाटत नाही. त्यावेळी शेतकऱ्यांच्या उन्हाची त्यांना आठवण येत नाही. आज मात्र त्यांचा बुरखा फाडायला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे.
दरम्यान आता उन्हाचं कारण पुढे देत मोर्चा स्थगित करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र आम्ही सर्वांच्या सूचनेचा आदर करतो. शेतकऱ्यांच्या जीवाची नक्कीच आम्हालाही चिंता आहे. त्यामुळे तीन वाजेनंतर चालण्याचा, रात्रीचा उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. केवळ फार्स करायचा, आमची समजूत काढण्यासाठी बैठका घेतल्या जातात, त्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जर गांभीर्य नसेल सरकारला गांभीर्य नसेल तर अशा मंत्र्यांच्या आणि कारभारावर विश्व ठेऊन मोर्चा स्थगित करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता, त्यामुळे या पार्श्वभूमीवर बैठक घेत सर्वांच्या एकमताने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अकोले ते लोणी पायी लॉंग मार्चला अकोलेतून सुरुवात झाली आहे. शहरातील बाजारतळ येथून विविध घोषणा देत मोर्चाने लोणीकडे कूच केली आहे.
मोर्चाच्या अग्रस्थानी राज्यभरातील सर्व नेते व पाठीमागे लाल झेंडे हातात घेतलेले आंदोलनकर्ते या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
अकोले ते लोणी पायी लॉंग मार्चमध्ये आपण पूर्णवेळ सहभागी होणार आहेत अशी माहिती लॉंग मार्चला संबोधित करतांना मॅगसेसे पुरस्कार विजेते जागतिक कीर्तीचे पत्रकार पी.साईनाथ यांनी दिली.
अकोले बाजारतळ येथे राज्यभरातून आलेले आंदोलनकर्ते एकत्रित आले. यानिमित्ताने अकोलेत आज लाल वादळ पुन्हा एकदा घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
Web Title: Police notice for long march citing hot weather, but Kisan Sabha started the agitation
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App