Home नाशिक रेल्वे रुळावर आढळला विचित्र अवस्थेत युवक-युवतीचा मृतदेह

रेल्वे रुळावर आढळला विचित्र अवस्थेत युवक-युवतीचा मृतदेह

Breaking News | Nashik: रेल्वे रुळावर युवक व विवाहीत युवतीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ.

body of a young man was found on the railway track in a strange condition

नाशिक | शिरवाडे वाकद:  खेरवाडी शिवारात रेल्वे रुळावर युवक व विवाहीत युवतीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे कर्मचारी किरण कर्डक यांनी कळविले वरुन पोलीस पाटील तेजल संदीप पवार यांनी फोनद्वारे सायखेडा पोलिसांना खबर दिली की, शनिवार (दि.३० नोव्हेंबर) रोजी रात्री १ वाजेपूर्वी खेरवाडी शिवारात रेल्वे लाईन जवळील पोल नं.२०७/९ जवळ एक अनोळखी पुरुष वय अंदाजे २८ वर्षे व एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे २० वर्षे हे रेल्वे कटींग होऊन विछिन्न अवस्थेत पडलेले आहे.

त्यानंतर सायखेडा पोलीस तातडीने घटनास्थळी तात्काळ हजर झाले असता तेथे एक मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईलवरुन नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मयत पुरुषाचे नाव अश्विन नवनाथ शिंगाडे (वय ३० वर्षे रा.दात्याने (दिक्षी) ता.निफाड) असे असल्याचे समजले. तर मयत अनोळखी स्त्री (वय २७ वर्षे रा.रामकृष्ण नगर, साईभक्ती अपार्टमेंट प्लॅट नं.१, इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे, मखमलाबाद, नाशिक ) असे असल्याचे तिचे पतीकडून कळले.

दरम्यान, याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात अ.मू.रजि.नं ४७/२०२४ भा.न्या.सु.सं.कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास सपोनि विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जाधव करीत आहेत.

Web Title: body of a young man was found on the railway track in a strange condition

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here