सुजय विखेंच्या निशाण्यावर डॉ. जयश्री थोरात | साकुर सभा व्हिडियो
Maharashtra Assembly Elections 2024 | Balasaheb Thorat vs Sujay Vikhe:
Sujay Vikhe And Jayashri Thorat News : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांचा राजकीय संघर्ष आता पुढच्या पिढीकडे वळता झालाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे आणि थोरात यांच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
थोरात यांच्या गावी जाऊन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर नुकतीचं जोरदार टीका केली होती.
दरम्यान याच टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांचा चांगलाचं समाचार घेतला होता. जयश्री थोरात यांनी, खबरदार ! माझ्या बापाविषयी बोलाल तर. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही, असा दम भरला होता. यामुळे थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष हा पुढच्या पिढीकडे आला असल्याचे दिसते.
आता या दोघांनीही एकमेकांवर शेलक्या शब्दात जोरदार हल्ले प्रतिहल्ले केल्याने थोरात विखे परिवारात तिसऱ्या पिढीतील संघर्षाची नांदी आता सुरू झाली आहे.
साकुर सभा व्हिडियो:
Web Title: Sujay Vikhe And Jayashri Thorat News
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study