Home नाशिक सततच्या भांडणाला कंटाळून दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

सततच्या भांडणाला कंटाळून दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

Breaking News | Nashik Crime: १० वी त शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

10th class student commits suicide due to her parents' quarrel

नाशिक | सिडको : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथे मंगळवारी दुपारी इयत्ता १० वी त शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भाग्यश्री सुनिल शिलावट (वय १६) असे मुलीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथे सुनिल शिलावट हे कुटुंबा समवेत राहतात. मंगळवारी सुनिल शिलावट कामासाठी घरा बाहेर होते. त्यांची पत्नी ही खाजगी नोकरीसाठी शहरात होत्या. त्यांची मुलगी भाग्यश्री ( वय १६) ही मंगळवारी इयत्ता दहावी परीक्षेचा पेपर देऊन घरी आली. या नंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास भाग्यश्री हिने राहते घरी स्वयंपाक घरातील फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतला. या नंतर तिची बहिण घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

भाग्यश्री हिच्या कडे चिठ्ठी सापडली. त्यात आई वडील यांच्या सततच्या भांडणाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे लिहीले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार राऊत करीत आहेत.

Web Title: 10th class student commits suicide due to her parents’ quarrel

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here