बीड अहमदनगर महामार्गावर दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू
Beed Accident: बीड अहमदनगर महामार्गावर दोन अपघाताच्या घटना, दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू.
बीड: बीड अहमदनगर महामार्गावर दोन अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू झाला आहे. बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात अॅम्बुलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (35 वर्ष), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35 वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून झालेल्या या अपघतात एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे
दुसरीकडे मुंबईहून बीडकडे जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघाता झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला आहे. आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील आष्टा फाटाजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Web Title: 10 people died in two accidents on Beed Ahmednagar highway
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App