Home Maharashtra News १२ ते १५ वयोगटातील बालकांचे लसीकरण केव्हा ? NTAGI कडून आली माहिती

१२ ते १५ वयोगटातील बालकांचे लसीकरण केव्हा ? NTAGI कडून आली माहिती

When are children between the ages of 12-15 vaccinated Information from NTAGI

मुंबई : देशात सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. तर १५ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. एनटीएजीआय (NTAGI) ग्रुपचे प्रमुख डॉ.एन के. अरोरा (Dr. N.K.Arora) यांनी पुढच्या टप्प्यात १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले जाणार असल्याचे संकेत दिले असून हे लसीकरण फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीपासून सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

डॉ. अरोरा म्हणाले १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारी पासून देशभरात लसीकरण सुरु झाले आहे. आतापर्यंत ३ कोटी हून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. पहिल्या दोन आठवड्यात ४५ टक्के मुलांना पहिला डोस मिळाला आहे. जानेवारीच्या अखेरीपर्यंत ७.४ कोटी मुलांना पहिला डोस दिला जाईल असा अंदाज अरोरा यांनी लावला आहे. तर फेब्रुवारीच्या सुरवातीपासून या मुलांना लसीचा दुसरा डोस देण्याची सुरवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

१२ ते १५ वयोगटासाठी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण सुरु होईल असे सध्याच्या वेगावरून दिसत असल्याचे डॉ. अरोरा म्हणाले. १२ ते १८ हा गट मोठ्या माणसांप्रमाणे मानला जातो आणि त्यामुळे त्यांचे लसीकरण प्रथम करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या गटाचे लसीकरण पूर्ण झाल्यावर त्या खालचा वयोगट विचारात घेतला जाणार असल्याचं अरोरा यांनी सांगितले आहे.

Web Title : When are children between the ages of 12-15 vaccinated? Information from NTAGI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here