Home अकोले अकोले तालुक्यातील १२ गैम्बलर पोलिसांच्या ताब्यात

अकोले तालुक्यातील १२ गैम्बलर पोलिसांच्या ताब्यात

12 arrested for gambling in Akole taluka

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील वीरगाव फाट्याजवळ कोंबड्यांच्या शेडच्या आडोशाला शनिवारी दुपारी तिरट नावाचा जुगार खेळताना १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व अकोले पोलीस या पथकाने संयुक्त कारवाई करत २५ हजार ११० रुपयांच्या रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र ताया लोखंडे, भरत सुखदेव गायकवाड रा. शाहूनगर, अनिल निवृत्ती वाकचौरे रा. निम्ब्रळ, माणिक सखाराम चासकर रा. बहिरवाडी, दिलीप काळू शिंदे रा. शाहूनगर, अचानक दामोधर गायकवाड रा.इंदोरी, भानुदास रावबा गोर्डे रा. बहिरवाडी, संदीप जयराम वैद्य रा. कुंभारवाडा अकोले, मोरेश्वर शांताराम चौधरी रा. अकोले, जयराम धोंडू लांघे रा. शेणीत, पुंडलिक देवराम भिडे रा. अकोले, अक्षय मारुती वाकचौरे रा. परखतपूर अशा १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय साबळे, पोलीस महेश आहेर, विठ्ठल शेरमाळे, राजेंद्र कोरडे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.  

Web Title: 12 arrested for gambling in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here