Breaking News | Sangamner: पुणे – नाशिक रस्त्यालगत संगमनेर येथे विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करत दारूचे खोके व चारचाकी वाहन, असा एकूण १२ लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
संगमनेर: श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पुणे – नाशिक रस्त्यालगत संगमनेर येथे विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करत दारूचे खोके व चारचाकी वाहन, असा एकूण १२ लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता.११) केली.
श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक गोकूळ नायकोडी, सहायक दुय्यम निरीक्षक जी. जी. ठुबे, जवान तौसिफ शेख, उद्धव काळे, ओमकार पालवे, महिला जवान आर. ए. काळापहाड, वाहनचालक निहाल शेख यांनी कारवाई केली. याप्रकरणी सोमनाथ माधव भाबड व सुभाष बाबुराव ढाकणे (दोघे रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांनी दिली आहे.
Web Title: 12 lakh worth of goods seized in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study