Home पुणे धककादायक! मामे भावाकडून १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

धककादायक! मामे भावाकडून १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

13-year-old girl sexually abused by cousin

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मामे भावानेच लैंगिक अत्याचार (sexually abused) केल्याचे उघडकीस आले आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारापासून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर परकार २ मार्च ते ११ जून २०२२ या कालावधीत सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे घडला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करून मालवण पोलिसांकडे वर्ग केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १३ वर्षीय मुलीवर फिर्यादीच्या भावाच्या मुलाने लं=लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी १८ आठवड्याची गरोदर राहिली. हा प्रकार मालवण तालुक्यात घडला. फिर्यादी यांची बहिण पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी हि सुट्टीनिमित्त रविवारी तिच्या मावशीकडे पिंपरी चिंचवडमध्ये आले. त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागले, तिला डॉक्टराकडे नेण्यात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: 13-year-old girl sexually abused by cousin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here