Home पुणे संतापजनक! 13 वर्षीय मुलीवर वडील, काका अन् चुलत भावाकडून बलात्कार

संतापजनक! 13 वर्षीय मुलीवर वडील, काका अन् चुलत भावाकडून बलात्कार

Breaking News | Pune Crime: एका 13 वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर.

13-year-old girl was raped by her father, uncle and cousin

पुणे:  पुणे शहराला हादरवरुन टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील एका 13 वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारं शहर म्हणून नावारुपास आलेले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घटणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याची टीकाही होत असते. त्यातच, आता अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुलीचे वडिल, चुलते आणि चुलत भावानेच हा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिले आहे. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते जून 2024 या कालावधी दरम्यान घडला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की,  पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका व चुलत भाऊ यांसह एकत्र कुटुंबात मांजरी भागात वास्तव्यास असून हे कुटुंबीय परप्रांतीय आहे. पीडित मुलीवर जुलै 2022 मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, जानेवारी 2024 मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्यावेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचेही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.  याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: 13-year-old girl was raped by her father, uncle and cousin

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here