Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! शॉर्टसर्किटमुळे आगीत 14 दुकाने जळाली

अहमदनगर ब्रेकिंग! शॉर्टसर्किटमुळे आगीत 14 दुकाने जळाली

Breaking News | Ahmednagar:  शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत 14 दुकाने जळून (Fire) खाक  झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत एकूण 47 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान.

14 shops were gutted in the fire due to short circuit

नेवासा: नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत 14 दुकाने जळून खाक  झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत एकूण 47 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आगीत सर्वाधिक 25 लाख रुपयांचे नुकसान प्रकाश सदाशिव साळुंके यांच्या पशुखाद्याच्या दुकानाचे झाले. त्यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 फिर्यादीत म्हटले की, रिजवान सादिक शेख यांच्या केकशॉपमध्ये शॉर्टसर्किट होवून आग लागल्याने 14 दुकाने जळाली. नगरपंचायत समोरच झालेल्या या जळीत कांडाच्या परिस्थितीचे अवलोकन करुन परिस्थितीच्या उपाययोजनेसाठी नगरपंचायतीचा एकही अधिकारी आणि प्रशासक असलेल्या तहसिल कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी सुट्टी असल्याचा बहाणा पुढे करत उपलब्ध झाले नसल्यामुळे नेवासकरांतून प्रशासनाच्या लहरी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेवासा नगरपंचायतीच्या आपत्कालीन स्थितीच्या उपाययोजनेसाठी असलेले दोन कर्मचारी नगरपंचायत चौकात ठाण मांडून बसून आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या असंवेदनशील व बेजबाबदार वर्तणुकीचा नेवासा शहरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

आगीत व्यावसायिकांचे मोठे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे फुटवेअर, बेकरी, जनरल स्टोअर, फुल भांडार अशी विविध दुकाने जळून खाक झाली. एका दुकानाला लागलेल्या आगीमुळे एका मागून एक अशा 14 दुकानांना या आगीने भक्ष्य बनवले. भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांनी आग विझविली. या घटनेमुळे शहारत हळहळ व्यक्त होत असून जळीताचा पंचनामा करुन नेवासा पोलीस ठाण्यात नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी आपली फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: 14 shops were gutted in the fire due to short circuit

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here