मॉडेल बनविण्याच्या आमिषाने १९ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी
Breaking News | Rape Case: मॉडेल बनविण्याच्या भूलथापा देत एका १९ वर्षी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना.
मुंबई: मॉडेल बनविण्याच्या भूलथापा देत एका १९ वर्षी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रसंगाचे व्हिडिओ आणि मॉडेल होण्यासाठी काढण्यात आलेली नग्न छायाचित्रे व्हायरल होतील अशी धमकी देण्यात आली. शिवाय कुटुंबाची ४५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. अखेर हिंमत करून तिने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या या तरुणीला मार्च महिन्यात हार्दिक नावाच्या व्यक्तीने इन्स्ट्राग्रामवर संपर्क साधला अन् मॉडेलिंग, अभिनयात रस आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर तरुणीने त्याचे प्रोफाईल पाहिले. त्यात हार्दिक याने धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याचे, अनेक नवोदित कलाकारांना संधी दिल्याचे नमूद केले होते. ही व्यक्ती विश्वासार्ह वाटल्याने विद्यार्थिनीने होकार दिला.
तरुणाने त्यानंतर तिला राहुल नावाच्या व्यक्तीला संपर्क साधण्यास सांगितले. राहुलने एकीकडे या विद्यार्थिनीकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. एका जाहिरातीत काम देण्याच्या बदल्यात त्याने एक लाख रुपयांची मागणी केली. तरुणीने स्वतःचे दागिने त्याला दिले.
त्यानंतर राहुलकडून सतत होत असलेली पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनीने घरातले सर्वच दागिने त्याच्या हवाली केले. यादरम्यान राहुलने इच्छेविरोधात विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार वारंवार होऊ लागला. राहुलने या प्रसंगाचे चित्रीकरण केले होते.
मॉडेल होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत तरुणीची नग्न, अर्धनग्न छायाचित्रे काढून घेतली होती. ती व्हायरल करण्याची धमकी राहुल देत असे. तसेच, माझे वडील आयपीएस आहेत. पोलीस तक्रार करून काही उपयोग नाही. उलट मी तुझ्या आई – वडिलांना नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकीही तो देत असे.
त्यामुळे हा अत्याचार निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे या विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले आहे. राहुलसोबत हार्दिक आणि श्रेयस या अन्य दोन तरुणांनीही धमकावून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थिनीने पोलीस तक्रारीत केला आहे.
Web Title: 19-year-old student was raped with the lure of becoming a model
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study