राज्यावर संकट! 24 तास धोक्याची, प्रशासनाने केला मोठा अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह…
Breaking News | Rain Update: आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस कोसळला असून सकाळीही पावसाचा जोर बघायला मिळतंय.

विदर्भ, मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. ढगाळ वातावरण राज्यातील अनेक भागात असेल. विजांसह पावसाचा अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत असून पिकांचे मोठे नुकसान झाले. दिवाळीनंतरही राज्यात पाऊस सुरू आहे. मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही असून त्यामुळे कमी दाबाचापट्टा निर्माण झाला.
नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मुंबई नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट आणि ‘हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये पुढील 24 तासांसाठी हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय.
पुढील एक ते दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहील नंदुरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानगर रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर या भागात पाऊस होईल. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. आंध्रप्रदेशात मोंथा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पाऊस पडतोय.
सततच्या पावसाने शेतकऱ्यांवर घाला, कापणी केलेल्या धानालाच फुटले अंकुर. गोंदियात शेतकऱ्यांचे धान पिकले पण वाचले नाही, शेतातच झाले नुकसान. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात गेली. धानाला शेतातच फुटले अंकुर. अतिवृष्टी, रोगकिडी आणि आता अवकाळी पाऊस, शेतकरी हतबल झाले आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित. दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केलेल्या मदतीचा एकही रुपया न आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण
Breaking News: 24-hour danger, administration issues Rain major alert
















































