Home क्राईम प्रेमसंबंधाचा फायदा, अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार

प्रेमसंबंधाचा फायदा, अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार

Pune Crime: महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित, बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल.

26-year-old woman rape after threatening to show obscene photos

पुणे:  महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी देवून संसार उध्दवस्त करण्याची भाषा करणार्‍याविरूध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत संजय वैराट असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हेमंत वैराटने फिर्यादीसोबतच्या फायदा घेतला. त्याने फिर्यादीच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीला सन 2018 ते दि. 11 एप्रिल 2023 दरम्यान वेळावेळी परिसरात बोलावून घेवुन कारमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले.

नंतर फिर्यादीने आरोपीस भेटण्यास दिला असता आरोपीने अश्लील फोटो फिर्यादीच्या पतीला दाखविण्याची धमकी देत संसार उध्दवस्त करण्याची भाषा केली आणि फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवुन त्यांच्या घरात जावुन माझा फोन का उचलत नाही असे म्हणून त्यांच्यासोबत जबरदस्ती केली. मला भेटायला न आल्यास मी बघतो काय करायचे ते पाहतो अशी धमकी हेमंत संजय वैराटने फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

Web Title: 26-year-old woman rape after threatening to show obscene photos

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here