धक्कादायक: या जिल्ह्यात २४ तासांत ३७५ मुलं कोरोनाबाधित
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ३७५ मुलं बाधित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. लहान मुलांमधील वाढणारे प्रमाण चिंताजनक मानली जात आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १८५१ रुग्ण आढळून आले आहेत, त्यामधील ३७५ रुग्ण हे १८ वर्षाच्या खालील आहेत. त्यात ७ ते १४ वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अवघ्या १ वर्षाच्या मुलालादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यांनी रुग्ण संख्या ही दोन हजाराच्या आत आली आहे. साडे चार हजारावर पोहोचलेली संख्या दोन हजारांच्या आता आली आहे. आज संगमनेर तालुक्यात सर्वाधिक २२० रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात संख्या घटली असून १३२ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: 375 children were corona infected in corona Ahmednagar