Home Maharashtra News देवदर्शनासाठी जातांना भरधाव 4 वर्षीय चिमुकल्याला ट्रँक्टरने चिरडले

देवदर्शनासाठी जातांना भरधाव 4 वर्षीय चिमुकल्याला ट्रँक्टरने चिरडले

4 year old Chimukalya was crushed by a tractor Accident 

Beed Accident | बीड:  आपल्या आज्जीसोबत देवदर्शनाला पायी चालत जात असतांना चार वर्षीय चिमुकल्याला एका भरधाव वेगातील ट्रँक्टरने दोघांनाही चिरडल्याची घटना घडली. या अपघातात  चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर आजी देखील गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल उशिरा गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गावर घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात माऊली अनिरुद्ध चव्हाण, वय 4 वर्षे रा.वंजारवाडी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सुमनबाई जालिंदर चव्हाण असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे.

दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत ट्रँक्टर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ट्रँक्टर चालकाविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 4 year old Chimukalya was crushed by a tractor Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here