Home अहमदनगर जिल्ह्यात चौथा पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात,  पोलिसावर गुन्हा

जिल्ह्यात चौथा पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात,  पोलिसावर गुन्हा

Pathardi Bribe Case: करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या  पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल. आत्तापर्यंत वर्षभरात चार जण जाळ्यात अडकले आहेत.

4th policeman in district in bribe net, crime against policeman

पाथर्डी: गौण खनिज वाहतूक करणाऱ्या जेसीबी व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाचेची (Bribe) मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या  पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तो पोलीस शिपाई शेवगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आहे. अहमदनगर येथील लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई केली.

संजय बडे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. पाथर्डी, माळी बाभूळगाव येथील जेसीबी मालक तसेच गौणखनिजांची वाहतूक करणारे डंपर आदी वाहनांचा पुरवठा करणारे ठेकेदार हे भागीदारीमध्ये व्यवसाय करत होते.

२ जुलै २०२२ रोजी तक्रारदार यांच्या मित्राच्या घरी शेवगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाचे पोलीसशिपाई संजय बडे यांनी येऊन जेसीबी मालकावर गौणखनिज उत्खननाबाबत गुन्हा दाखल करून जेसीबी व वाहने जप्त करण्याची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ जुलै रोजी फोनवरून ५० हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार १३ जुलै २०२२ रोजी पाथर्डी तालुक्यातील येळी येथे पंचासमक्ष पोलीस शिपाई संजय बडे याने तक्रारदाराकडून तडजोडी अंती ४० हजारांच्या लाचेची मागणी केली; परंतु लाचेची रक्कमं स्वीकारताना आरोपी संजय बडे यास लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय आला. तो वाहनात बसून फरार झाला होता. त्यानुसार पंचासमक्ष लाच मागितल्यावरून नाशिक विभागाच्या परवानगीनुसार सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, पो. ना. रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राहुल डोळसे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय बडे विरुद्ध हजारांची ४० लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: 4th policeman in district in bribe net, crime against policeman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here