मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य; गुन्हा दाखल
Breaking Crime News: ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग.
छत्रपती संभाजीनगर: एका ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आणि दोन वेळा गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला झालेला त्रास लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत काकाने तिच्याशी गैरवर्तण केलं. त्यामुळे मुलगी सतत घाबरून राहत होती. काकाने अतिप्रसंग आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या लेकीला अचानक काय झालं या विचाराने तिची आई देखील चिंतेत होती.
मुलीला काही त्रास होत आहे का? तिची तब्येत ठिक नाही का? याबाबत आईने तिच्याकडे चौकशी केली. मात्र चिमुकली काहीही सांगत नव्हती. शेवटी आईने तिला विश्वासात घेतलं आणि तिच्याशी बातचीत केली. त्यावेळी तिने घडलेली घटना आपल्या आईला कथन केली. हा सर्व प्रकार ऐकून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नराधम काकाला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून आईने थेट पोलीस स्टेशन गाठत सर्व घटना पोलिसांना सांगितली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात काका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: 50-year-old man had an affair with his sister-in-law’s minor daughter
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News