Home अहमदनगर एटीएम कार्डची अदलाबदल करून ५८ हजार काढले; तिघांविरुध्द गुन्हा

एटीएम कार्डची अदलाबदल करून ५८ हजार काढले; तिघांविरुध्द गुन्हा

Breaking News| Ahmednagar: एटीएम कार्डची अदलाबदल करून एका वृध्द महिलेच्या बँक खात्यातून ५८ हजार २०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार. (Fraud)

58 thousand was withdrawn by exchanging the ATM card fraud

अहमदनगर: एटीएम कार्डची अदलाबदल करून एका वृध्द महिलेच्या बँक खात्यातून ५८ हजार २०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार केडगाव उपनगरात घडला आहे.

ज्योती वाल्मीक राठोड (वय ६१ रा. पाटील कॉलनी, अंबिकानगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड आहे. त्या ते कार्ड घेऊन मंगळवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास केडगाव येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांना तीन अनोळखी व्यक्ती भेटले. त्या तिघांनी मिळून फिर्यादीची दिशाभूल केली व त्यांच्याकडील एटीएम कार्ड फिर्यादीला दिले व फिर्यादीचे एटीएम कार्ड त्यांच्याकडे घेतले. काही वेळाने ते तिघे तेथून निघून गेले. त्यांनी एटीएम कार्डचा वापर करून फिर्यादीच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ५८ हजार २०० रुपये काढून घेत फसवणूक केली. सदरचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 58 thousand was withdrawn by exchanging the ATM card fraud

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here