अहमदनगर: पाच दिवसांत आढळल्या ८५ हजारांवर कुणबी नोंदी
Ahmednagar News: जिल्ह्यातील ४६ लाख दस्तावेजांची केली तपासणी. (Maratha Reservation)
अहमदनगर: गेल्या पाच दिवसांत जिल्हाभरात ४६ लाख शासकीय दस्तावेजांची तपासणी केली असता ८५ हजारांवर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीचे काम युध्दपा तळीवर आहे. पहिल्या दिवशी १० हजारांवर कुणबी नोंदी आढळल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून शिक्षण, महसूल, महापालिका नगरपालिका कारागृह, सहनिबंधक भूमिअभिलेख आदीसह विविध विभागांच्या वतीने तपासणी सुर आहे. जिल्हास्तरीय तालुकास्तरावरून माहिती जमा करण्यात आली आहे.
नगर तालुक्यात १ लाख ५ हजार शासकीय नोंदी तपासण्यात आल्या आहेत. या तपासणीत ४९४ कुणबी नोंदी आल्याचे तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत १ गेल्या पाच दिवसांत ४६ लाख दस्तावेजाची तपासणी केली आहे. त्यातून ८५ हजारांवर कुणबी नोंद आढळून आल्या आहेत.
उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणीकरण करून ते जिल्हास्तरीय संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. जिल्हास्तरीय कक्षाकडे उपलब्ध झालेली आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविली जात आहे. अनेक नोंदी मोडी लिपीत आवळून येत आहे. या मोडीचे वाचन करण्यासाठी मोडी तज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title: 85 thousand Kunbi records were found in five days in Ahmednagar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App