Home पुणे दुरूस्तीसाठी सोसायटीत आला… फरफटत नेत 85 वर्षीय महिलेवर जिन्यात बलात्कार

दुरूस्तीसाठी सोसायटीत आला… फरफटत नेत 85 वर्षीय महिलेवर जिन्यात बलात्कार

Pune Crime News: एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 85 वर्षांच्या महिलेवर बलात्कार.

85-year-old woman was raped in the stairwell

पुणे:  पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 85 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार करणारा आरोपी 23 वर्षांचा आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली.

नेमकी काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया,  पीडित 85 वर्षीय महिला पाचव्या मजल्यावर राहते. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ती आपल्या फ्लॅटच्या समोर असलेल्या मजल्यावरच फेरफटका मारत होती. यावेळी एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी 23 वर्षीय तरूण आला होता. पाचव्या मजल्यावर आल्यानंतर वासनांध आरोपीने महिला एकटीच फिरत असल्याचं पाहिलं आणि संधी साधली. महिलेचं तोंड दाबून आरोपीने तिला जिन्यावरून फरफट नेलं.

सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार केला. त्याचबरोबर जेव्हा तिने यासाठी प्रतिकार करत आरडाओरडा केला त्यावेळी आरोपीने तिला गळा दाबून मारहाणही केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.

पीडित 85 वर्षीय महिलेने हा घृणास्पद प्रकार घरी जाऊन सांगितला. या प्रकरणी पिडीतेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी ओम जयचंद पुरी (वय 23, सध्या रा. साखरे वस्ती, मुळ रा. धाराशिव ) याला काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीला अटक करण्याच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्याने हे काम दारूच्या नशेत केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: 85-year-old woman was raped in the stairwell

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here