Home संगमनेर संगमनेरात बंद घराच्या आडोशाला गांजाची विक्री

संगमनेरात बंद घराच्या आडोशाला गांजाची विक्री

Breaking News | Sangamner Crime: १५३८ ग्रॅम गांजा मदिनानगर येथील कारवाईत जप्त केला.

Sale of marijuana in the courtyard of a closed house in Sangamner

संगमनेर : बंद घराच्या आडोशाला गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत १,५३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सोमवारी (दि. ३) ५:३० सुमारास संध्याकाळी वाजेच्या शहरातील मदिनानगर येथे ही कारवाई करण्यात आली.

अबरार रऊफ शेख (वय ४६, रा. अलकानगर, संगमनेर) आणि नासीर मोहम्मद शेख (वय ४०, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने शेख याला घेतले. ताब्यात त्याच्याकडून २५ हजार २०० रुपये किमतीचा १,५३८ ग्रॅम वजनाचा गांजा आणि १,७५० रुपये असा एकूण २६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Breaking News: Sale of marijuana in the courtyard of a closed house in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here