काँग्रेस नेत्याकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, बेडरुममध्ये नेऊन अंगावर पेट्रोल ओतले अन्…
Breaking News | Buldhana Crime: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला, युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांनी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. विशालने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली.

बुलढाणा: राज्यात आजपासून स्थानिक स्वराज संस्थाची रणधुमाळी सुरु आहे मात्र अशातचय बुलढाण्यातून सर्वांना हादरवणारी बातमी समोर आली आहे. युवक कॉंग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीला पेट्रोल ओतून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चिखली पोलीसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांचा त्यांच्या पत्नीशी सतत वाद होत असे, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. यातूनच काकडे यांनी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने समयसूचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवली आणि आपला जीव वाचवला.
याप्रकरणी पत्नी नमिता काकडे यांनी चिखली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल काकडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास सुरु आहे.
चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भागवत कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून वाद सुरु होते. याचवेळीविशाल याला अज्ञात महिलेचा फोन आला. पत्नी नमिताने कुणाचा फोन आहे असं विचारलं असता विशाल चिडला आणि रागाच्या भरात पत्नीला बेडरूम मध्ये नेले. तिच्याअंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले मात्र नमिताने समाज सुचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला याप्रकरणी पोलिसांनी पती विशाल सह सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Breaking News: Congress leader attempts to burn wife alive
















































