पहिल्या पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप, धारदार वस्तऱ्याने कपाळावर केला वार
Breaking News | Beed Crime: पतीने पत्नीच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केल्याचे धक्कादायक घटना समोर.

बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केल्याचे धक्कादायक घटना समोर आले आहे. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
क्रांतीनगर येथील रहिवासी सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्यात चार महिन्यांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे अंजना लांडगे या क्रांतीनगर येथील त्यांच्या मुलाच्या घरी राहत होत्या. याच काळात सतीश लांडगे यांनी दुसऱ्या महिलेशी लग्न करून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच अंजना लांडगे यांनी पतीकडे विचारणा केली. तेव्हा सामान आणि घर बांधण्यासाठी दिलेले २ लाख रुपये परत मागितले असता, सतीश लांडगे यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. या घटनेनंतर अंजना लांडगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पती सतीश लांडगे, अलका मुजमुले, किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांनतर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अंजना लांडगे यांचा मुलगा आणि सून ऊस तोडण्यासाठी साखर कारखान्यावर गेले होते. त्यावेळी अंजना लांडगे घरी एकट्या असल्याची संधी साधून पती सतीश लांडगे यांच्यासह अलका रोहिदास मुजमुले, किरण रोहिदास मुजमुले आणि कुणाल रोहिदास मुजमुले हे चौघेजण त्यांच्या घरात घुसले. त्यावेळी या चौघांनी अंजना लांडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर, सतीश लांडगे याने अंजना लांडगे यांच्या कपाळावर धारदार वस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Breaking News: Husband got angry when he asked his first wife for an answer, stabbed
















































