संगमनेर तालुक्यात भरदिवसा धाडसी चोरी, ऐवज लंपास
Breaking News | Sangamner theft: कुटुंबीय बाहेर गेल्याने साधली संधी, आठवडे बाजाराच्या दिवशी भरदिवसा चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडून मोठी चोरी केली. भर वस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भरदिवसा चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडून मोठी चोरी केली. भर वस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आश्वी- निमगावजाळी रस्त्यावर गावठाण नजीक असलेल्या म्हसे वस्तीवर राहत असलेल्या लक्ष्मण किसन घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. घोडके कुटुंब (पत्नी, मुलगा आणि सून) हे सर्व कामावर गेले असल्याने घराला बाहेरून कुलूप लावले होते आणि लक्ष्मण घोडके हे स्वतः आश्वी बुद्रूक येथे डॉक्टरकडे गेले होते.
घोडके कुटुंब बाहेर गेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा म्हणजे सकाळी ९ ते १ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील खोलीत प्रवेश करून दोन लोखंडी २ लाख १२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कपाटांची उचकापाचक केली. या कपाटांमधून १ लाख २० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत, ४० हजार रुपये किमतीचा ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा सर, ३२ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे कानातले, तसेच २० हजारांची रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
यापूर्वी या परिसरात छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या असून घोडके यांच्या शेजारी राहत असलेल्या जऱ्हाड यांचा घरातील महिलेच्या अंगावरील दागिने भरदिवसा ओरबाडून नेले होते. या गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Breaking News: Bold theft in broad daylight in Sangamner taluka, property looted
















































