Home संगमनेर संगमनेर शहर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई, अवैध धंदेचालकांत खळबळ

संगमनेर शहर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई, अवैध धंदेचालकांत खळबळ

Breaking News | Sangamner: वेगवेगळ्या चार ठिकाणच्या अवैध दारुविक्री अड्ड्यांवर कारवाईत करत ११ हजार ४९० रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त.

Sangamner city police take action against illegal businesses

संगमनेर- येथील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवायांना सुरूवात केली आहे. सोमवारी (दि.१०) वेगवेगळ्या चार ठिकाणच्या अवैध दारुविक्री अड्ड्यांवर कारवाईत करत ११ हजार ४९० रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त केली. तर एका ठिकाणच्या मटका अड्ड्यावर छापा टाकून २०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून कारवायांना वेग आला आहे. त्यानुसार पथकाने पहिली कारवाई पाच वाजेच्या सुमारास सुकेवाडी येथे केली. अवैध दारुविक्रेता

रोहिदास काशिनाथ बर्डे याच्याकडून १५२० रुपयांची देशी दारु जप्त करत गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द येथील अवैध दारुविक्री अड्ड्यावर छापा टाकून ७२० रुपयांची देशी दारु जप्त करत विक्रेत्या महिलेवर गुन्हा दाखल केला. तिसरी कारवाई सहा वाजून वीस मिनिटांनी सुकेवाडी येथे केली.

हॉटेल बिरोबाबनच्या आडोशाला भारत कान्हू शिंदे व दर्शन भारत शिंदे हे दोघे अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री करत होते. परंतु, पोलीस आल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले. येथून ८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला. चौथी कारवाई घुलेवाडी येथे केली. ग्रामीण रुग्णालयाच्या भिंतीलगत संतोष बबन पवार (वय ३२, रा. कतार गल्ली, संगमनेर) यास मटका अड्डा चालवताना पकडले. त्याच्याकडून २०५ रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.

पाचवी कारवाई सव्वासात वाजेच्या सुमारास वैदूवाडी येथे केली. अवैध दारुविक्रेता बाबाजी राजू लोखंडे हा पोलीस आल्याचे पाहून पळून गेला. तेथून ५६० रुपयांची दारु हस्तगत केली. या सर्व कारवाया मिळून ११ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शहर पोलिसांत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. या कारवायांमुळे अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.

Breaking News: Sangamner city police take action against illegal businesses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here