Home महाराष्ट्र धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Breaking News | Mumbai Crime:  खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार.

A 14-year-old girl was assaulted by giving gungi medicine

मुंबई: खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर असून तिच्या आत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नोव्हेंबरमध्ये पीडित मुलगी खेळत असताना खाऊ देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला घरी नेले व तांदळाच्या पेजमधून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही माहिती दिल्यास तिला व तिच्या आत्याला मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिच्या आत्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी ५० वर्षीय आरोपीविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A 14-year-old girl was assaulted by giving gungi medicine

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here