Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाचे ४० वर्षीय महिलेशी लग्न

संगमनेर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाचे ४० वर्षीय महिलेशी लग्न

A 60-year-old man marries a 40-year-old woman in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील ६० वर्षीय वृद्धाचे ४० वर्षीय महिलेचे लग्न झाल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. या सुखद घटनेमागे कारण देखील तसेच आहे. स्वतः च्या कन्याने हा निर्णय घेतला आहे.

एक वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाले. मुलीचा विवाह झाल्याने ती सासरी गेली. त्यामुळे पित्याच्या वाट्याला आलेलं एकटेपण त्रासदायक होऊ शकत. त्यांना आधाराची गरज असल्याचे समजून कन्याने स्वतः च्या ६० वर्षीय पित्याचे शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला. शिदोडी येथील तबाजी चिमाजी कुदनर व त्यांना सरत्या काळात साथ देणाऱ्या ४० वर्षीय सहचरणीचे सुमन तबाजी कुदनर असे नाव आहे.

६० वर्षीय तबाजी चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले त्यानंतर मुलीचे देखील लग्न झाले. त्यामुळे ते घरात एकटेच राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत होते. त्यात शेती जनावरे सांभाळण्याची ताकद कमी होत होती. त्यांच्या एकटेपणावर मात म्हणून मुलगी सरिता बाचकर व मित्रपरिवार यांनी त्यांना लग्नाचा सल्ला दिला. सुरुवातीला समाज काय म्हणेल हे काय लग्नाचे वय आहे का अशा अनेक प्रश्नांमुळे नकार दिला. मात्र मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील शिंगवे गावातील ४० वर्षीय सुमनबाई सोबत केवळ ८ ते १० वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत विधिवत मंगलकार्य पार पडले.

Web Title: A 60-year-old man marries a 40-year-old woman in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here