Home भारत 70 वर्षीय वृद्धाला मसाज पडली जीवघेणी

70 वर्षीय वृद्धाला मसाज पडली जीवघेणी

massage parlor died

थायलंड : पर्यटनासाठी सर्वात प्रसिद्ध असलेल्या जागांपैकी एक जागा म्हणजे थायलंड. जगभरातील लोक फक्त मजामस्ती करण्यासाठी या देशात येतात. विशेषतः पुरुषांसाठी ही जागा अधिक खास आहे. त्यामुळे बहुतेक पर्यटक एकटेच येथे मजा-मस्ती करण्यासाठी येतात. येथील Adult Style Nightlife भरपूर चर्चेत असते. थायलंडला गेल्यावर जवळपास सगळेच इथल्या मसाज पार्लरचा आनंदही घेतात. मात्र एका व्यक्तीला ही मसाज भलतीच महागात पडली. मसाज करून घेत असतानाच या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, ते पाहून सगळेच शॉक झाले.

ब्रिटनचा 70 वर्षीय व्यक्ती सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी ब्रिटनहून पटाया येथे आला होता. आणि त्यानेही मसाज पार्लरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हॅपी एंडिंग नावाच्या मसाज पार्लरमध्ये गेल्यावर त्याला कपडे काढून टेबलवर झोपण्यास सांगितलं गेलं. यानंतर तिथल्या महिलेनं त्याला सर्विस द्यायला सुरुवात केली. मात्र जेव्हा तिने या व्यक्तीला सरळ होण्यास सांगितलं तेव्हा त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर समजलं की या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

या व्यक्तीची मसाज करणाऱ्या महिलेचं नाव मिस ओरॅया होतं. तिने सांगितलं की सुरुवातीला हा व्यक्ती नॉर्मल होता. मात्र, नंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची विचारपूस केली असता, या व्यक्तीने आपण ठीक असल्याचं सांगितलं. मात्र, यानंतर त्याने हालचाल बंद केली. नंतर समजलं की या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे पाहून ओरॅया ओरडू लागली. मदतीसाठी आलेल्या टीमने या व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली, मात्र त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह तपासासाठी आपल्यासोबत नेला. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मसाज पार्लरच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती पहिल्यांदाच त्यांच्याकडे आला होता. त्याच्याकडे कोणतंही आयडीकार्ड सापडलं नाही. यामुळे त्याची ओळख पटवणं अवघड जात आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत, जेणेकरून त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल.

Web Title : A 70-year-old man died at a massage parlor in Thailand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here