अहमदनगर: ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! धक्कादायक प्रकार
Breaking News | ahmednagar raped : एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातिल एका गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर महिन्याभरपासून अत्याचार करणे सुरूच ठेवले होते. दरम्यान, हा व्हिडिओ मुलींच्या नातेवाइकांनी पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार आणि युवराज नंदू शेंडगे असे आरोपींची नावे असून त्यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावात हा प्रकार घडला. एक नऊ वर्षांच्या मुलीला आरोपींनी धमकावत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी बनवला. या नंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल महिन्या भरपासून आरोपी मुलीवर अत्याचार करत होते. दरम्यान, हा व्हिडिओ मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहचला. त्यावेळी त्यांना ही बाब लक्षात आली.
Web Title: A 9-year-old girl was gang-raped
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study