Home जालना धक्कादायक! ९ वर्षीय बालिकेवर पाच नराधमांकडून अत्याचार

धक्कादायक! ९ वर्षीय बालिकेवर पाच नराधमांकडून अत्याचार

Breaking News | Jalna Crime:  एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना.

A 9-year-old girl was raped by five murderers

जालना येथील चंदनझिरा भागात एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना रविवारी (दि. १३) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. चंदनझिरा भागात एक महिला आपल्या नऊवर्षीय मुलीसोबत राहते. मोलमजुरी करून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. नेहमीप्रमाणी रात्री जेवण झाल्यावर मायलेकी झोपल्या होत्या. परंतु रात्री साडेनऊच्या सुमारास

मुलीच्या आईला फोन आल्याने मुलीची आई बांधकाम कामगाराची पेटी आणण्यासाठी गेली होती. मुलगी घरात एकटीच होती. परत घरी आल्यावर मुलगी घरात दिसली नसल्याने मुलीच्या आईने कॉलनीतील नागरिकांसह सर्वत्र शोध घेतला. कॉलनीलगतच्या एका नाल्यात मुलगी रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर अत्याचार करून, बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडली होती.

Web Title: A 9-year-old girl was raped by five murderers

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here