Home अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला आठ हजारांची लाच  घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला आठ हजारांची लाच  घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribe Case Shevgaon, Ahmednagar: आठ हजारांची लाच घेताना पकडले : शहरातील स्मशानभूमीजवळ लावला सापळा.

a bribe of eight thousand to an employee of land record office

शेवगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला आठ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने शेवगावातील स्मशानभूमीजवळ सोमवारी पकडले. आजोबांच्या नावे असलेल्या २१ गुंठे जमिनीची मोजणी करून घेतल्यानंतर मोजणीनुसार खातेदारांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आलेला सुधारित नकाशा देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे भूकर मापक प्रदीप शंकर महाशिकारे यांच्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमरापूर (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय तक्रारदारांनी त्यांच्या आजोबांच्या नावावर असलेल्या अमरापूर शिवारातील २१ गुंठे जमिनीची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्यासाठी आरोपीने १० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये आरोपी लोकसेवकाने पंचांच्या समक्ष १० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते.

सोमवारी शेवगाव ते ताजनापूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ नियोजित ठिकाणी लाचलुचपत विभागाने सापळा लावून आरोपीला पंचांच्या समक्ष लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी, पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, शरद गोर्डे यांच्या पथकातील पोलिस हवालदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, सचिन सुटुक, आसाराम बटुळे, हरून शेख यांनी केली आहे.

Web Title: a bribe of eight thousand to an employee of land record office

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here