Home Maharashtra News आता Nilesh Rane यांच्यावर नवा गुन्हा दाखल; पुढे काय होणार ?

आता Nilesh Rane यांच्यावर नवा गुन्हा दाखल; पुढे काय होणार ?

Nilesh Rane

Nilesh Rane : नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सत्र न्यायालयाबाहेर भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. मात्र त्यांना आता ही बाब महागात पडण्याची शक्यता आहे. हुज्जत घटल्याबद्दल ओरोस पोलिसांनी निलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणात पुढे कारवाई झाल्यास राणे कुटुंबीयांसाठी आणखी एक धक्का बसू शकतो. सध्या संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी न्यायालयाच्या वाऱ्या करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नितेश राणे अज्ञातवासात असताना त्यांचा ठावठिकाणा माहिती असला तरी सांगणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट म्हटले होते.

पोलिसांनी नारायण राणे यांना याबाबत थेट चौकशीची नोटीस पाठवली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांना अटक देखील झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करुन राणे कुटुंबीयांना आणखी एक कायद्याचा धक्का दिला आहे. पोलिसांनी न्यायालयाबाहेर झालेल्या गदारोळा बाबत निलेश राणे आणि त्यांच्या पाच समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर भादवी कलम १८६, १८८, २६८, २७० पोलिसांशी हुज्जत घालणे, त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणणे अशा कलमांअनव्ये गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक आग्रही होते. त्यांनी पोलिसांना तसे पत्रही पाठवले होते.

मंगळवारी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळाला होता. यानंतर नितेश राणे न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांची गाडी रोखून धरली होती. त्यामुळे नितेश यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे हे कमालीचे आक्रमक झाले. यानंतर निलेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला (नितेश) १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना पोलीस गाडी अडवू कशी शकतात? असा जाब निलेश राणे यांनी पोलिसांनी विचारला. बराचवेळ यावरून वाद सुरु होता. यामुळे निलेश राणे मोठ्या तावातावाने पोलिसांशी बोलत असल्याचे समजते. यानंतर नितेश राणे गाडीतून बाहेर पडून पुन्हा न्यायालयात गेले होते. काही तांत्रिक कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर नितेश राणे यांना कोर्टाच्या आवारातून बाहेर जाऊ देण्यात आले.

Web Title : A case has been registered against Nilesh Rane for arguing with the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here