Home अहमदनगर अहमदनगर: पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

अहमदनगर: पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

Breaking News | Ahmednagar: रात्री लाईट आल्यावर विहिरीवर पाईपचा कॉक फिरवताना पाय घसरून पाण्यात पडल्याने शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

A farmer drowned after falling into a well

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर शिवारात बुधवारी रात्री लाईट आल्यावर विहिरीवर पाईपचा कॉक फिरवताना पाय घसरून पाण्यात पडल्याने रवींद्र सुभाष आदिक (वय ४५) या तरुण शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 खानापूर नवीन गावठाण येथील रवींद्र उर्फ बाबुराव सुभाष आदिक हा वस्ती जवळच्या शेतातील विहिरीवर वीज पंप चालू करून विहिरीच्या काठावर रात्री १० च्या सुमारास अंधारात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात ठिबकसाठी पाईपचा कॉक फिरवत असताना पाय घसरून पाण्यात पडला. आवाज ऐकून कुटुंबियांसह बाजुचे शेतकरी मदतीला धावून आले. रवींद्रला विहिरीतून बाहेर काढल्यावर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर खानापूर गोदातीरावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक मिल्कचे माजी संचालक कचरू भानुदास आदिक यांचा तो पुतण्या होत.

Web Title: A farmer drowned after falling into a well

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here