Home पुणे धक्कादायक! खाऊच्या आमिषाने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

धक्कादायक! खाऊच्या आमिषाने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Breaking News | Pune Crime: चार वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

A four-year-old girl was abused by baiting her with food

पुणे : हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बालिकेवर अत्याचार करुन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी बालिकेच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची चार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथे एक २० ते २२ वर्षांचा तरुण आला. त्याने बालिकेला खाऊचे आमिष दाखविले. घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या खोलीत बालिकेला नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे राहणाऱ्या एका तरुणाने बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकला.

तरुण तेथे गेला. तरुण आल्याचे पाहून आरोपी बालिकेला तेथे सोडून पसार झाला. या घटनेची माहिती हडपसर पोलिसांनी कळविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.

Web Title: A four-year-old girl was abused by baiting her with food

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here