Home Crime News दागिन्यांच्या हव्यासापोटी मैत्रिणीने घोटला मैत्रिणीचा गळा

दागिन्यांच्या हव्यासापोटी मैत्रिणीने घोटला मैत्रिणीचा गळा

Dombivli Crime

डोंबिवली : सोमवारी डोंबिवली शहरातील टिळक नगर भागात एका ५८ वर्षीय महिलेची हत्या झाली होती. या हत्येचा तपास पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावला असून पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या एका महिलेला याप्रकरणी अटक केली. केवळ दागिन्यांसाठी हत्या केली असल्याची कबुली या महिलेने दिली आहे.

सोमवारी सकाळी टिळकनगर परिसरात एका हत्येने खळबळ माजली होती. घरात एकट्याने राहत असलेल्या विजया बाविस्कर या ५८ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. पोलिसांच्या पाच स्वतंत्र तुकड्या करून विविध बाजुंनी शोधकार्य सुरू केले. यानंतर सीसीटीव्हीचंग मदतीने त्यांना संशयास्पद महिला आढळून आली. आणि दुसऱ्याच दिवशी महिलेच्या हत्येप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली.

जवळच्याच भागात पोळीभाजी केंद्र चालवणारी सीमा खोपडे ही महिला विजय बाविस्कर यांची मैत्रीण होती. त्या रात्री ती विजया यांच्या घरी झोपण्यासाठी आली होती. याच रात्री तिने दागिन्यांच्या हव्यासापोटी गळा दाबून हत्या केल्याची बाब आता उघड झालेली आहे. सदर महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. यात आणखी काही बाजू आहेत का? याबाबत पोलीस सखोल चौकशी करणार आहेत.

Web Title : A friend killed his friend for the sake of jewelry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here