Home नागपूर प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून

प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून

Nagpur Crime: अनैतिक संबंध ठेवण्यात तीन वर्षीय सख्खी मुलगी अडसर ठरत होती. त्यामुळे महिलेने आणि तिच्या प्रियकराने मुलीचा निर्दयतेने खून केल्याची घटना उघडकीस.

a girl who is an obstacle in love is killed by her mother

नागपूर : अनैतिक संबंध (Love affair) ठेवण्यात तीन वर्षीय सख्खी मुलगी अडसर ठरत होती. त्यामुळे महिलेने आणि तिच्या प्रियकराने मुलीचा निर्दयतेने खून केला. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली. मात्र, या हत्याकांडाची कुणकुण नागरिकांना लागली. त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी पुढाकार घेऊन हे हत्याकांड उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली. निता चामलाटे आणि (२८, नांदा) आणि राजपाल मालविय (३२, रा. देवास) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  ताराचंद्र चामलाटे याला दोन बायका आहेत. त्याची दुसरी बायको ही निता असून तिला तीन वर्षाची मानसी नावाची मुलगी होती. आहे. निता ही पतीसह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदा गावात कामानिमित्ताने आली होती. दरम्यान, तेथेच कामाच्या शोधात आलेला युवक राजपाल मालविय याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले. ताराचंद्रला दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो नेहमी दारुच्या नशेत असल्यानंतर राजपाल घरी येत होता. त्यामुळे दोघांचे अनैतिक संबंध वाढले. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधात तीन वर्षीय मुलगी मानसी ही अडसर ठरत होती. तसेच पत्नीचे राजपालशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पती ताराचंद्रला लागली. त्यामुळे त्याने आपले मूळ गाव भंडारा गाठले. प्रियकर राजपालने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तीन वर्षीय मुलगी पतीकडे किंवा कुटुंबियांकडे ठेवण्याची अट त्याने ठेवली. भंडारा जिल्ह्यात राहायला गेलेल्या पतीकडे मुलीला ठेवणे शक्य नसल्यामुळे निता अडचणीत आली. राजपाल आणि निताने मुलीचा खून केला. तिची विल्हेवाट भंडारा जिल्ह्यात लावली. मात्र, पोलिसांनी या हत्याकांडाचा उलघडा केला आहे.  गुन्हा दाखल करुन दोघांनाही खापरखेडा पोलिसांनी अटक केली.

असे केले हत्याकांड:

निता आणि राजपाल यांनी मुलीचा खून करुन नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. २६ डिसेंबरला मुलीच्या डोक्यात काठी मारुन तिचा खून करुन अपघात झाल्याचा बनाव केला. मुलीचा मृतदेह पहिला पती ताराचंद्र याच्या घरी नेला. मुलगी घराच्या छतावरुन खाली पडून जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर गावात मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. सर्व काही कटानुसार व्यवस्थित झाल्याने निता आणि तिचा प्रियकर आनंदित होते.

असे आले उघडकीस हे प्रकरण:

ताराचंद्रची दुसरी बायको कल्पना हिला मुलीच्या अपघाती मृत्यूवर संशय आला. मुलीच्या शरीरावर चटके दिल्याचेही व्रण कल्पना हिला दिसले होते. मात्र, कुटुंबियांच्या भीतीपोटी तिने याबाबत संशय व्यक्त केला नाही. मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर निता लगेच प्रियकरासह निघून गेली. कल्पना हिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गोंदीयातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी निताला ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या. निताने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. खापरखेडा पोलिसांनी निता व राजपाल यांना अटक केली.

Web Title: a girl who is an obstacle in love is killed by her mother

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here