Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीला पळविले

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीला पळविले

Breaking News | Ahilyanagar: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना. दुसरी घटना: तरुणाची दुकानात आत्महत्या

A minor girl was kidnapped

अहिल्यानगर: मुकुंदनगर परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २६ मे रोजी घडली. या प्रकरणी तिच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन २७ मे रोजी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

अहिल्यानगर: तरुणाची दुकानात आत्महत्या

अहिल्यानगर: तणनाशक दुकानात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. २७ मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद संभाजी म्हस्के (वय ३०, रा. टाकळीकाझी, ता. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रसाद याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याचा भाऊ प्रवीण म्हस्के याने त्याला रुग्णवाहिकेतून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अधिक तपास महिला अंमलदार कर्डक करत आहेत.

Breaking News: A minor girl was kidnapped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here