Home लातूर वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवर संचालिकेच्या मुलांकडून अत्याचार

वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवर संचालिकेच्या मुलांकडून अत्याचार

Breaking News | Latur Crime: मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील एका अल्पवयीन मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत काही दिवसांपूर्वी आक्समात मृत्यूची नोंद.

A minor girl was molested by the manager's children in the hostel

लातूर: लातूर शहरात कस्तुरबा कन्या छात्रालयात मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील एका अल्पवयीन मुलीचा अपघाती (Accidental Death) मृत्यू झाल्याबाबत काही दिवसांपूर्वी आक्समात मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली होती. तथापि मयत मुलीच्या वडीलांनी संशय घेत दुसऱ्यांदा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यास सांगितले. या शवविच्छेदन अहवालातून संबधित मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यावरुन वस्तीगृह संचालिकेसह तिच्या दोन मुलांवर विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशा सदाशिव गुट्टे, शंकर सदाशिव गुट्टे आणि विठ्ठल सदाशिव गुट्टे अशी संशयीतांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.

कस्तुरबा कन्या छात्रालय नावाचे वस्तीगृह आहे. तिथे एका मजुराच्या दोन मुली 2023 पासून राहत होत्या. 28 जून रोजी सकाळी वसतीगृह संचालिकेने मुलीच्या वडीलांना त्यांची मुलगी दोरीत पाय अडकून पडल्याने तिला सरकारी दवाखान्यात अडमिट केले आहे, असे सांगितले. वडील दवाखान्यात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मुलगीचे निधन झाल्याचे सांगितले.

लातूर येथील शासकीय रुग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले होते. परंतु, मुलीच्या वडीलांनी मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. लातुरमध्ये तशी सोय नसल्याने सोलापूर येथील रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तिथे मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. या वरुन पोलिसांनी वसतीगृह संचालिका व तिचे दोन मुलांवर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.

Web Title: A minor girl was molested by the manager’s children in the hostel

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here