Home Crime News धक्कादायक! वडील आणि भावा कडून १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! वडील आणि भावा कडून १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Kalyan Crime

Kalyan Crime : रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कल्याण कोळसेवाडीमध्ये उघडीस आली आहे. १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वडील आणि भावा कडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. घटना उघड झाल्या नंतर कोसळसेवाडी पोलिसांनी दोन्ही पिता पुत्राला अटक केली आहे.

कोळसेवाडी परिसरातील पिता पुत्रावर लैंगिक अत्याचारच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. मित्राला चहा का दिला? यावरून पीडितेच्या बापाने पिडीतेला मारहाण केली होती. यानंतर सामाजिक संघटनांना याबाबत माहिती मिळाली असता विचारपूस केल्यानंतर अल्पवयीन पीडितेने नराधम बापाने आणि भावाने केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती पोलिसांसमोर कथन केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपींना गजाआड केले.

बाप आणि भावाकडून गेल्या 6 महिन्यापासून लैगिंक अत्याचार होत असल्याची माहिती आईसह शेजाऱ्यांना पिडीतेने दिली होती. यानंतर सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आणि घृणास्पद आणि संताप जनक कृत्य समोर आले. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी देखील मागणी होऊ लागली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख, पोलिस अधिकारी बोचरे आणि कोळसेवाडी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title : A minor girl was sexually abused by her father and brother in Kalyan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here