पोलिस कॉन्स्टेबलने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    Breaking News | Beed Crime: पोलिस कॉन्स्टेबलने नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

    A minor girl was sexually assaulted by a police constable

    बीड: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आहे. व्हॅलेंटाईन्स डेदरम्यान प्रॉमिस डेच्या दिवशी हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मात्र, प्रमुख आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

    पीडित मुलगी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा पीडितेच्या नातेवाईक आहे. आरोपी मुंबई पोलिसात कार्यरत असून गेल्या महिन्यात 11 फेब्रुवारीला त्याने गावी येऊन पीडितेला आपल्या वासनेची शिकार केले. आरोपीला या कामात गावातील दोघांनी मदत केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करून त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस स्टोशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    पिंक पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठून आरोपीला मदत केलेल्या दोघांना ताब्यात घेतले. टॅक्टर चालक समीर खेडकर आणि गॅरेजवर काम करणारा हरिओम खेडकर अशी त्या दोघांची नावे आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे देखील संबंधित पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शरद टेकाळे, मुद्दशर शेख, नितीन साप्ते यांनी ही कारवाई केली आहे.

    Web Title: A minor girl was sexually assaulted by a police constable

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here