Home क्राईम धक्कादायक ब्रेकिंग! सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार – Crime News

धक्कादायक ब्रेकिंग! सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार – Crime News

Breaking Crime News: एका सहा वर्षीय मुलीवर अत्याचार (abused) केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

A six-year-old girl was abused

पैठण : पैठण तालुक्यातील वडवाळी येथे एका सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पैठण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पैठण लगत असलेल्या तेलवाडी शिवारात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २६ डिसेंबर रोजी पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात असताना रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव, रा. वडवाळी, ता. पैठण याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय भवर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. आरोपी हा पिडीत मुलीच्या घराजवळ राहत असून गावात यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली होती असे समजते. मात्र गावातील प्रकरण असल्याने ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले होते. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे, फौजदार संजय मदने, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर ओव्हळ, नरेंद्र अंधारे, सचिन आगलावे, सुनील गायकवाड हे करत आहे.

Web Title: A six-year-old girl was abused 

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here