Home पुणे १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

१७ वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Breaking News | Pune Crime: शारीरिक संबंध ठेवताना आरोपी पीडित मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये काढले. (raped)

A video of a 17-year-old girl being raped has gone viral

पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केला. त्यावेळी बनवलेला व्हिडीओ पीडितेच्या आई-वडिलांना अन्य मोबाइल नंबरचा वापर करून व्हॉट्सअॅपवरून पाठविला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल ताज शेख (२२, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख हा मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवताना आरोपी पीडित मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर आरोपीने वारंवार मुलीवर अत्याचार केले.

Web Title: A video of a 17-year-old girl being raped has gone viral

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here