Home महाराष्ट्र घरात घुसून दार लावलं! चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार

घरात घुसून दार लावलं! चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार

Mumbai Crime: मुंबईतील मानखुर्द येथील परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.

A woman was raped at knifepoint

मुंबई: मुंबईत महिलेवरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मानखुर्द येथील परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. महिला घरात एकटी असताना आरोपीने हे विकृत कृत्य केल्याची बातमी आहे. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  सोमवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास, २७ वर्षीय महिला तिच्या घराच्या दारात बसली होती. तर, तिची दोन मुले आत होती. तसेच, तिचा नवरा कामावर गेला होता. याचाच फायदा घेत अल्पवयीन मुलाने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. अल्पवयीन आरोपीने महिलेला घरात जाताना पाहिल्यानंतर त्याने तिच्या मागे जाऊन दरवाजा बंद केला.

यानंतर आरोपीने किचनमधून चाकू काढला आणि तिला सांगितले की जर तिने, त्याने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या नाहीत तर, तो तिची आणि तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या करेल. यानंतर आरोपीने महिलेवर जबरदस्ती केली, आणि बाहेरून दरवाजा बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केल्यावर शेजाऱ्यांनी बाहेरून दरवाजा उघडून, घडलेल्या प्रकाराबद्दल पती आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरू केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली होती. आरोपी स्थानिक होता, परंतु पोलिसांनी आरोपीच्या घरी शोध घेतला असता, तो त्याच्या घरी सापडला नाही. घटनास्थळावरुन पळ काढल्यानंतर आरोपीने त्याचा फोनही बंद ठेवला होता. फरार आरोपीचा शोध पोलिसांचे पथक रात्रभर घेत होते. अखेर मंगळवारी दुपारी त्याच परिसरातून अल्पवयीन आरोपीला पकडण्यात आले.

वासनांध झालेल्या अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेवर, चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A woman was raped at knifepoint

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here