Home भारत बाजारातून प्रिंट केलेले आधारकार्ड वैध नाही – UIDAI

बाजारातून प्रिंट केलेले आधारकार्ड वैध नाही – UIDAI

Aadhaar card

मुंबई : UIDAI ने आधार कार्ड संदर्भात सर्वसामान्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. UIDAI च्या म्हण्यानुसार खुल्या बाजारातून PVC आधार प्रत वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. अशा PVC कार्ड्समध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा वैशिष्ट्ये नसल्यामुळे आधार कार्डाची प्रिंटेड प्रत बाजारातून मिळवणे टाळावे. UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला PVC आधार कार्ड हवे असेल तर तुम्ही 50 रुपये शुल्क भरून आधार कार्डच्या शासकीय एजन्सीकडून ते ऑर्डर करू शकता.

PVC कार्ड, प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड सामान्य बाजारातून बनवले असेल, तर ते वैध धरले जाणार नाही. UIDAI ने असेही सांगितले आहे की, कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड वापरून ग्राहक त्यांचे काम करू शकतात. uidai.gov.in या संकेत स्थळावरून डाउनलोड केलेले आधार, आधार पत्र किंवा एम-आधार प्रोफाइल त्याचबरोबर UIDAI द्वारे जारी केलेले PVC कार्डचाच तुम्ही व्यवहारात वापर करु शकता.

आधार जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने खुल्या बाजारातून छापलेल्या प्लॅस्टिक कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांचा अभाव असल्याचे कारण देत ते न बनवण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. प्लास्टिक कार्ड बनवण्यासाठी ग्राहक UIDAI च्या पोर्टलवर 50 रुपये भरून ते थेट ऑर्डर करू शकतात. हे प्लास्टिक कोटिंग कार्ड काही दिवसात तयार होऊन संबंधित व्यक्तीच्य घरच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

Web Title : Aadhaar card printed from the market is not valid – UIDAI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here