Home अहमदनगर कोपरगाव:  अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोपरगाव:  अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar News:  दोन वेगवेगळ्या घटना. अज्ञात आरोपीने सतरा वर्षीय मुलीचे अपहरण.

Abduction of a minor girl and molestation of a minor girl

कोपरगाव : चासनळी येथून अज्ञात आरोपीने सतरा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली असून संबंधित पित्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटलं आहे की, आपण आपल्या मुलीस घेऊन दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आपल्या दहिवडी येथील गावातून सिन्नर तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आलो असता आपल्या ताब्यातील मुलगी अज्ञात इसमाने अपहरण केली आहे. मुलीचा शोध घेऊनही ती आपल्याला मिळून आली नाही. दरम्यान या प्रकरणी फिर्यादी कानसकर यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस हे.कॉ.एस.डी. बोटे आदींनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हे. कॉ. एस. डी. बोटे करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोपरगाव : घरात तेरा वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली असून आरोपी राजेंद्र फुलारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या क्लासवरून घरी आली होती. यावेळी घरात अन्य कोणी सदस्य उपस्थित नव्हते. हीच संधी साधत राजेंद्र फुलारे याने घरात प्रवेश केला. तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी तिच्या घरातील सदस्य आले. तेव्हा राजेंद्र फुलारे याने त्यांना धक्का देऊन पळ काढला. याबाबत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आदींनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस जेरबंद केले आहे.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ४५२, ५०६, भादंवि कलम सह कलम ७, ८ पोस्को प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.

Web Title: Abduction of a minor girl and molestation of a minor girl

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here