नात्याला काळिमा; सावत्र बापाचा १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Bhiwandi Crime: २४ वर्षीय सावत्र बापाने १० वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार (abuse) केल्याची धक्कादायक घटना.
भिवंडी: २४ वर्षीय सावत्र बापाने १० वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेने नराधम सावत्र बापाने बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमा विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नाराधमास अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, या घटने प्रकरणी सुरुवातीला २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी सावत्र बापाने ३ अज्ञातांनी मुलीला गाडीत टाकून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावच्या डोंगरावर नेवून तिच्यावर अतिप्रसंग करून तिला घरी आणून सोडल्याची बनावट बतावणी केली होती.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी गणेशपुरी पोलिसांच्या मदतीने ६ पोलीस पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे कसून तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी अल्पवयीन पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर नराधम बापानेच अत्याचार केल्याचे तिने कथन केले. पोलिसांनी सावत्र बापाची चौकशी केल्यानंतर सावत्र बापाने कबुली दिली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विविध कालमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Web Title: Abuse of 10-year-old minor girl by stepfather
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App