अहिल्यानगर: गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: एका गावातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन एकाने अत्याचार.
नेवासा : नेवासा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन एकाने अत्याचार केला. याप्रकरणी एका आरोपीसह दोघांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश अंकुश राजगुरू असे आरोपीचे नाव असून ऋतुजा रमेश सालके, रमेश बाळासाहेब सालके (रा. बोल्हेगाव फाटा, नगर) असे त्याला मदत करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली, पीडित मुलगी दहावीत शाळेत असताना आरोपी घरी फर्निचरचे काम करण्यासाठी येत होता. त्यावेळी त्याने बळजबरीने मुलीशी मोबाईलवर बोलणे व चॅटिंग सुरू केले. पुढे बारावी झाल्यानंतर मुलगी राहुरी येथे अॅकॅडमीमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तिला मोबाईलवर संपर्क करीत होता. त्याची गुरू बहीण बोल्हेगाव एमआयडीसी नगर येथे राहत होती. त्यांनी नवीन घर घेतले होते. त्या वास्तुशांती असल्याने आरोपी पीडितेला घेऊन बोल्हेगाव येथे गेला. पण वास्तुशांती आधीच झाली होती. त्यादिवशी जेवणानंतर पाण्यात त्यांनी पीडितेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर आरोपीने अत्याचार करून फोटो काढले. त्यानंतरही तो वारंवार संपर्क करीत होता. त्यास नकार दिल्यानंतर तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देता होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Abuse of a girl by giving gungi medicine
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study