संगमनेर: अल्पवयीन मुलीवर मुलाकडून अत्याचार! मुलीने दिला बाळाला जन्म
Sangamner Breaking: अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
संगमनेर : अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (abuse) केल्याची घटना तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही एका आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख इयत्ता आठवीवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांशी झाली होती.
या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना या दोघांनी तेथून पळ काढला आणि ते त्यांच्या पाहुण्यांच्या घरी राहिले. दीड ते दोन महिने या ठिकाणी राहत होते. या ठिकाणी दोघांमध्ये संबंध आले. जून २०२३ मध्ये पीडित मुलगी आईच्या घरी गेली असता मुलीला मळमळ होऊ लागली होती. आईने तिच्याकडे चौकशी केली असता, या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेले. तिला दिवस गेले असल्याची माहिती समजल्याने त्यांचा साध्या पद्धतीने विवाह पार पडला. दि. १३ डिसेंबर रोजी या मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अत्याचाराचा गुन्हा पुणे ग्रामीणला नोंदविण्यात आला होता, मात्र घटना संगमनेर तालुक्यातील असल्याने घारगाव पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग करण्यात आला. या घटनेतील आरोपी मुलगा अल्पवयीन आहे.
Web Title: Abuse of a minor girl by a boy The girl gave birth to a baby
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App