Home अहमदनगर अहमदनगर: प्रियकराचा खून करून प्रेयसीवर अत्याचार

अहमदनगर: प्रियकराचा खून करून प्रेयसीवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करून प्रियकराला ठार मारल्याची घटना.

Abuse of girlfriend by killing boyfriend

कोपरगाव: प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करून प्रियकराला ठार मारल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात घडली. या घटनेने कोपरगाव तालुका हादरून गेला आहे. तीन आरोर्पीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३) रा. जेऊर पाटोदा, कोपरगाव याचे व फिर्यादी मुलीचे प्रेमसबंध होते. मयत हा फिर्यादी मुलीला त्याच्या मोटारसायकलवरून कोळपेवाडी येथील त्याचा मित्र आरोपी अर्जुन उर्फ भुर्ज्या गोपाल पिंपळे व आरोपी चांदणी पिंपळे यांचे घरी घेऊन गेला होता. रात्रीच्यावेळी मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी मुलगी व आरोपी चांदणी पिंपळे हे एका खोलीत झोपले असताना मयत नागेश चव्हाण हा पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी जवळ गेला व तिच्यासोबत बळजबरी करू लागला. त्याचा आवाज ऐकून आरोपी चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादीच्या जवळ गेली. तेव्हा मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे यांच्यात भांडणे सुरू झाली. घरात भांडण चालू असल्याने आरोपी चांदणी पिंपळे हिने आरोपी भुर्ज्याचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहीत नाही यास बोलावून घेतले. त्यानंतर ५ वाजेच्या दरम्यान आरोपी भुर्ज्याचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहीत नाही याने नागेश चव्हाण यास खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले. त्यानंतर आरोपी अर्जुन पिंपळे याने नागेश चव्हाणला जिवे मारण्याच्या हेतूने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला तसेच आरोपी अर्जुन पिंपळे याने फिर्यादी मुलीला चाकूचा धाक दाखवून, तिच्या सोबत बळजबरीने रीने लैंगिक अत्याचार करून कोंडून ठेवले. आरोपी चांदणी पिंपळे हीने मयत नागेश चव्हाण याला बांधण्यासाठी साडी आणली व तीनही आरोपींनी संगनमताने नागेश चव्हाण याचा मृतदेह गोणीत भरून, साडीने बांधून कोठेतरी पाण्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नाहीसा केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात घडली.

यामुळे कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वरील तीनही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३७६ (२) (आय), ३४२, २०१, ५०४, ५०६, ३४ सह बालकाचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चेक ४, ६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन पिंपळे याला पोलिसांनी अटक केली असून दोन आरोर्षीचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी करत आहेत.

Web Title: Abuse of girlfriend by killing boyfriend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here